पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा २६१ मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांचे ३१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाहेर निघाले. यापैकी सौ. स्मितादेवी शंभुराज देसाई यांचा अर्ज मंत्री शंभुराज देसाई यांना मिळालेल्या पक्ष्याच्या नामनिर्देशन पत्रात प्रस्तावकासह बदली (दुय्यम) नामनिर्देशन पत्र असल्याने ते शंभुराज देसाई यांच्या अर्जासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. या कारणाने सौ. स्मितादेवी शंभुराज देसाई यांचा अर्ज छाननीत बाहेर निघाला. तर अपक्ष असलेले उमेदवार शेखर रमेश देसाई रा. उरुल, शंभुराज कोंडीबा डिगे रा. डिगेवाडी, संजय महिपती देसाई रा. त्रिपूडी या तीन अपक्ष उमेदवारांचा अर्ज प्रतिज्ञापत्र सादर नसल्याने बाद झाले. आता २२ उमेदवारांपैकी १८ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.
पाटण विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या अर्ज छाननीत चार उमेदवारांचे अर्ज बाहेर गेले असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे महायुती शिवसेना शिंदे गटातून मंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई रा. मरळी, महाआघाडी शिवसेना ठाकरे गटातून हर्षद मोहनराव कदम रा. मल्हारपू, अपक्ष सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर रा. पाटण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट- विकास पांडुरंग कांबळे रा. बेलवडे खुर्द, बहुजन समाज पार्टी महेश दिलीप चव्हाण रा. जिंती, वंचित बहुजन आघाडी बाळासो रामचंद्र जगताप रा. काळगाव, रिपब्लिकन सेना- सचिन नानासो कांबळे रा.- कुसरुंड, राष्ट्रीय मराठा पार्टी सयाजीराव दामोदर खामकर रा. आवडे,
राष्ट्रीय समाज पक्ष संभाजी शिवाजी कदम रा. त्रिपूडी यांच्यासह अपक्ष- प्रकाश तानाजी धस रा. मंद्रुळकोळे, चंद्रशेखर शामू कांबळे रा. चोपदारवाडी, सर्जेराव शंकर कांबळे रा. पाटण, दिपक बंडू महाडिक रा. बनपूरी, यशस्वीनी सत्यजितसिंह पाटणकर रा. पाटण, सुरज उत्तम पाटणकर रा. मणदुरे, विजय जयसिंग पाटणकर रा. आंबळे, संतोष रघुनाथ यादव रा. विहे, प्रताप किसन मस्कर रा. मस्करवाडी यांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत.
अर्ज मागे घेण्याची मुदत चार दिवस दि.०४ नोव्हेंबर पर्यंत असून शिल्लक लिहिलेल्या अर्जापैकी किती उमेदवार निवडणूकीतून माघार घेत न अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष असताना पाटण विधानसभा र निवडणुकीचे चित्र दि. ०४ नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे.