सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी फलटणची कांदाबाजार पेठ प्लॅस्टिमुक्त करावी : चेतन घडिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी प्लॅस्टिमुक्त फलटणची कांदाबाजार पेठ करण्यासाठी पुढाकार घेत प्लॅस्टिक मुक्त बाजारपेठेचे मानकरी व्हावे असे आवाहन भुसार कांदा अडत व्यापारी असोसिएनशचे नवनिर्वाचिन अध्यक्ष चेतन घडिया यांनी केले.

भूसार कांदा अडत व्यापारी असोसिएशन व फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांसाठी एका पत्रकाचे प्रकाशन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माहिती देताना अध्यक्ष चेतन घडिया बोलत होते यावेळी उपाध्यक्ष राजेश शहा, सचिन धिरेन शहा यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थितीत होती.

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदरील उपक्रमाचे कौतुक करीत शेतकर्‍यांनी प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कांद्यासाठी सुतळी गोणी वापरण्याचे आवाहन केले.