सातारा प्रतिनिधी | “माणचा आमदार हा उर्मट आहे, तो घरे पेटवण्यासाठी काम करतो तर मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन,”असे सांगत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी माण – खटाव विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
अनिल देसाई यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून मान खटावमधून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पवारांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर देसाई यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.
यावेळी अनिल देसाई म्हणाले की, माण आणि खटाव मतदारसंघातील कार्यकर्ते घेऊन आलो आहे. शरद पवार साहेबांकडे मी उमेदवारीची मागणी केली आहे. या आधी 15 वर्षे मी थांबलो आहे. त्यामुळे यंदा मला उमेदवारी पाहिजे.
गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 17 जण इच्छुक होते, आता तर चारच जण इच्छुक आहेत. प्रभाकर देशमुख हेदेखील मला साथ देतील. जयकुमार गोरे यांनी पाण्याचे राजकारण केलं आहे. पण पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. आमचा आमदार घरे पेटवण्यासाठी काम करतो, मी चुली पेटवण्यासाठी कामे करेन. मान खटावमधून शरद पवार मला संधी देतील हा माझा विश्वास असल्याचे देसाई यांनी म्हंटले.