पोलीस असल्याचे भासवून वृद्ध महिलेचे दागिने केले लंपास; भामटे CCTV कॅमेऱ्यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लूटण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, पोलिस असल्याचे भासवत कराड शहरातील शुक्रवार पेठेतील एका महिलेची 80 हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची माळ दोघा भामट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान, या घटनेतील दोन भामटे सीसीटिव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी व फिर्यादीने दिलेल्या माहिती नुसार, श्रीमती निर्मला मोहन पवार (वय 56, रा.82, खंडागळेवाडा शुक्रवारपेठ ता. कराड जि. सातारा)यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात गंठण चोरी प्रकरणी फिर्याद दिली आहे. निर्मला पवार या शुक्रवार पेठेत राहत असून त्यांनी सन 2012 साली दोन तोळे वजनाची षटकोनी मण्याची साखळीतील सोन्याची दोन पदरी माळ बनवली होती. त्या नेहमीप्रमाणे नवकला चौक येथील एका दुकानात भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. भाजी घेऊन घरी जात असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डवरगल्ली येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 3 चे समोरुन रोडवरवरुन पायी चालत जात असताना रोडवर दोन इसम थांबले होते.

त्यांनी जवळ बोलावून ‘आम्ही साध्या वेशातील पोलीस आहे. असे म्हणुन नाव, पत्ता लिहून घेतला. तसेच “तुम्ही गळ्यात सोन्याची माळ घालुन फिरु नका. चोर फिरत आहेत. इथे लक्ष्मीबाईच्या गळ्यातील काढुन घेतले आहे. पेपरला बातमी आली आहे. तुमची माळ काढुन द्या. कागदात बांधून देतो,” असे सांगितले. त्यावेळी संबंधित महिलेने गळ्यातील सोन्याची माळ विश्वासाने सदर इसम पोलीस आहेत असे समजुन इसमाकडे दिली. नंतर त्यांनी सोन्याची माळ कागदाच्या पुडीत बांधुन महिलेच्या भाजीचे पिशवीत ठेवली. त्यानंतर पिशवी घेऊन महिला घरी गेली.

घरी गेल्यावर वृक्ष महिलेने कागदाची पुडी उघडुन पाहिली असता त्यामध्ये दगडाचे खडे आढळून आले. त्यानंतर वृद्ध महिलेने कराड शहर पोलीस ठाणे गाठत त्या ठिकाणी चोरीबाबत तक्रार दिली. यानुसार पोलिसांनी 80 रुपये किंमतीची एक दोन तोळे वजनाची षटकोनी मण्याची साखळीतील दोन पदरी सोन्याची माळ घेऊन फसवणूक केल्याची नोंद केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असून त्यांना चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. या प्रकरणी दोन अनोळखी इसमाविरुध्द पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.