सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य केले. या योजनेतील पैशांच्या वाटपानंतर आता योजणेवरून श्रेयवाद रंगला आहे. याचेच उदाहरण हे साताऱ्यात पहायला मिळतेय. ज्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेची घोषणा केली त्यांचाच फोटो सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या होर्डिगवरून अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे.
साताऱ्यातील पोवई नाक्यावरील महायुती सरकारकडून नुकताच एक लाडकी बहिण योजनेचे होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे. मात्र, या होर्डिंगवर फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो लावला नसल्याने याची चांगलीच चर्चा सद्या सर्वत्र सुरू आहे.
महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेची घोषणा अंतरीम अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर या योजनेंतर्गत पात्र असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलाच्या खात्यात दर महिन्याला सरकारकडून दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत.