सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात दाखल झाली या यात्रेत अजित पवारांनी सातारा जिल्हयातील एका पठ्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले. एक पँट शर्ट, एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडला, असे सांगत. कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाहीतर मग चक्की पिसिंग चक्की पिसींग करायला लावणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना टीकेवर काही लोकं चेष्टा करतात की दीड हजार रुपयात काय होणार? अरे तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार गरिबांची परिस्थीती? एका महिलेने दीड हजार रूपयांच्या राख्या विकत घेतल्या. त्या महिलेने राख्या विकल्या त्यातून तिला 20 हजार रुपये मिळाले. आता विरोधी पक्षातील एकजण म्हणाला की लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद करा… तुझ्या काय पोटात दुखतय… तुला काय कळणार गरिबाच दुःख.
अदिती तटकरे 1200 सायकल वाटणार आहे. मतदारसंघात 10 हजार सायकल वाटणार आहे. या आधी सुनिल तटकरे इथ आमदार होते. त्यांनी केलं का तुमच्यासाठी तर नाही केलं. पण आता पोरगी बापापेक्षा वस्ताद निघाली आहे. आम्ही श्रीवर्धन ते हरीहरेश्वर पर्यंत पूल करणार आहोत. तुम्हाला 16 किमी अंतर 5 मिनिटांत पार करता येणार आहे, असे अजित पवार म्हणाले.