पाटण प्रतिनिधी | खरीप हंगामाच्या अनुषंगाने पाटण तालुक्यातील तारळे, पाटण व देबेवाडी मंडळांतर्गत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. या भेटी दरम्यान मौजे बोरगेवाडी येथे फरांदे यांनी नाचणी पीक प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट दिली व नाचणी पिकाची लागण केली व उपस्थित शेतकऱ्यांना नाचणी पीकाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मुख्यत्वे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत कृषी माल प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती फरांदे यांनी मौजे डोरोशी येथे भुईमूग रुंद सरी वरंबा पीक प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट दिली व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शेतकन्यांना सूर्यफूल पिकासंदर्भात मार्गदर्शन करुन मोफत सूर्यफूल बियाण्याचे वाटप करण्यात आले. मौजे राहुडे येथे सोयाबीन पीक प्रात्यक्षिक क्षेत्रास भेट दिली तसेच उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन, सूर्यफूल पिकासंदर्भात मार्गदर्शन करुन मोफत सूर्यफूल बियाण्याचे वाटप करण्यात आले.
मोजे सरूल येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ या वर्षातील कल्पना श्रीरंग शिंदे यांच्या प्रक्षेत्रावरील फळबागेस भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच शिंदे यांनी मौजे सुरूल येथे गट क्रमांक ४४३ मध्ये ०.६० हे. क्षेत्राबर २४० आंब्याच्या रोपांची सघन पद्धतीने 5×5 मीटर अंतरावर लागवड केली असून कृषी विभागामार्फत अनुदानाचा लाभ ही घेण्यात आला आहे. चालू वर्षात जास्तीत जास्त शेतकन्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच पडीक क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे आवाहन फरांदे यांनी केले.
त्याचबरोबर मोजे सुरुल येथील लक्ष्मण संकपाळ व बकाजी निकम यांना कृषी उन्नती योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या सोयाबीन प्रमाणित चियाणे वाण फुले संगम या प्लॉटची पाहणी केली व मार्गदर्शन केले. मानेगाव येथे अधिक मारुती माने यांच्या ऊस सपर केन नर्सरी प्रात्यक्षिक प्लॉटला भेट दिली व मार्गदर्शन केले. तसेच श्री. माने यांचे शेतावर सफरचंद फळबाग लागवड शुभारंभ करण्यात आला.
या दौरा कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी कराड रियाज मुल्ला, तालूका कृषी अधिकारी पाटण कुंडलिक माळवे, मंडल कृषी अधिकारी हेबेवाडी चंद्रकांत कोळी, मंडळ कृषी अधिकारी पाटण तुकाराम सारुक, मंडळ कृषी अधिकारी तारळे विनोद जांभळे तसेच कृषी पर्यवेक्षक महादेव आगवणे, कृषी सहाय्यक विद्या जंगम, अर्जन पवार, गणेश सावंत व तारळे, पाटण व ढेबेवाडी मंडळातील संबंधित क्षेत्रीय कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.