कृषी विभागाचे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन; पेरणीबाबत दिल्या ‘या’ सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या पाऊस पडत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येला जनतेला सामोरं जावं लागत आहे. अशात काल जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. अशात कृषी विभागाकडून पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.ली पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करू येऊ नये. शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धुळ पेरणी करू नये, अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सूनचा अंदाज घेवून पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे , खते व किटकनाशके शेतक-यांना आवश्यकतेनुसार व रास्तदरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. शेतकऱ्यांना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांचा साठा उपलब्ध होईल. यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्तालय स्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी 1800-2334000 या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्याकडून देण्यात आली.

खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ होते. प्रमुख खरीप पिकांमध्ये भात (भात), मका, ज्वारी, बाजरी, मूग, भुईमूग, ऊस, सोयाबीन, उडीद, तूर यांचा समावेश असतो. बियाणे खरेदीसह इतर शासकीय योजनाही शेतकऱ्यांच्या हितासाठी असतात. त्याबाबत माहिती मिळत नसेल तर चिंता करू नका Hello Krushi हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा आणि शासकीय अनुदानाच्या योजनांविषयी माहिती घेऊ शकतात. शिवाय तुमच्या जवळच्या कृषी केंद्रांशीही संपर्क साधू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे अँप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या खत दुकानदार, रोपवाटिका आणि कृषी केंद्रे यांची यादी दिसेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

पेरण्याबाबत कृषी विभागाच्या सूचना :

१) शेतकऱ्यांनी पेरणी करताना साधारणपणे २० टक्के जादा बियाणांचा वापर करावा.
२) सलग संपूर्ण क्षेत्रावर एकचपीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा.
३) पेरणीकरताना रुंदसरी वरंबापद्धतीने (बीबीएफ ) पेरणी करावी.
४) जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन ( मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा.