सातारा प्रतिनिधी । अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे. राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे. यामधून पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जात असून सातारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यंदाच्या २०२४-२५ वर्षात एकूण १ हजार २०० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाते. शेतीबरोबरच शेतकऱ्याने फळबाग लागवड करून आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी फळबाग लागवडीसारखी योजनाही आहे. तसेच रोजगार हमी योजनेतूनही शेतकऱ्यांना फळबाग लागवड करता येते.
यामध्ये विविध फळांची लागवड करण्यात येते. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे संबंधितांच्या शेतावर फळबाग बहरलेली दिसत आहे. त्यामुळे बळीराजाला चार पैसेही मिळत आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
योजनेसाठी नेमके पात्रतेचे निकष काय?
१) योजनेंतर्गत कमीत कमी अर्धा १ एकर आणि अधिकाधिक दोन हेक्टरपर्यंत प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा व इच्छुक लाभार्थीच्या नावे जमीन असणे
२) जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास आणि सातबारावर कुळाचे नाव असेल तर योजना राबविताना कुळाची संमती आवश्यक
३) योजनेसाठी लाभार्थी ३ जॉबकार्डधारक असावा व शेतकरी अल्पभूधारक असावा
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा : भाग्यश्री फरांदे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. यामधून शेतकरी फळबागा घेऊन आर्थिक स्रोत वाढवू शकतात. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापुढे माण, खटाव आणि उष्णकाळी भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्याशी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
फळबागांसाठी असे अनुदान.. (हेक्टरी झाडे यानुसार मिळते रक्कम)
आंबा कलमे : १,९८,९४२
काजू कलमे : १,४०,८३७
काजू रोपे : १,३२,४३६
चिकू : १,९५,६८७
पेरू : १,६०,६०७
डाळिंब : १,६७,८५६
सीताफळ रोपे : १,५५,९४५
सीताफळ कलमे : १,६७,९४५
चिंच, जांभूळ रोपे : १,१७,९९७