सातारा प्रतिनिधी । पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने यावर्षीही रब्बी हंगामात जिल्ह्यातील पाच पिकांसाठी स्पर्धा घेण्यात आलेली आहे. यामुळे विजेत्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत पीक उत्पादनवाढीची शर्यत लागल्याने जोमदार पिके आलेलीही पाहावयास मिळणार आहेत.
शेतकऱ्यांकडून भरघोस पीक उत्पादना वाढविण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात. यातून पीक उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढू शकते. तसेच त्यांच्याकडून नव्या उमेदीने आणखी अद्ययावात तंत्रज्ञानाचा वापर होऊन कृषी उत्पादन वाढीस लागेल. तसेच अशा शेतकऱ्यांचे मार्गदर्शनही इतरांनाही होऊन कृषी उत्पादनात भर पडेल. या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने पीक स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीच्या रब्बी हंगामातही तालुका, जिल्हा तसेच राज्यपातळीवर पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे.
उमेदीने आणखी अद्ययावात तंत्रज्ञानाचा वापर होऊन कृषी उत्पादन वाढीस लागेल. तसेच अशा शेतकऱ्यांचे मार्गदर्शनही इतरांनाही होऊन कृषी उत्पादनात भर पडेल. या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने पीक स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीच्या रब्बी हंगामातही तालुका, जिल्हा तसेच राज्यपातळीवर पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे.
पात्रता अन् निकष…
■ शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे आणि ती जमीन स्वतः कसणे आवश्यक आहे.
■ शेतकऱ्याला एकावेळी एकापेक्षा अधिक पीक स्पर्धेत सहभाग घेता येईल.
∎ स्पर्धेतील शेतकऱ्यायाने पिकाखालील किमान ४० आर (०.४० हेक्टर) क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे.
३१ डिसेंबरपर्यंत मुदत...
रब्बी हंगामातील पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ)
- ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- ७/१२, ८ अचा उतारा
- जातप्रमाणपत्र (आदिवासी असल्यास)
- पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वर घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा
- बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
तालुका ते राज्यस्तरावर होणार स्पर्धा…
ही पीक स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर अशी होत आहे. यासाठी बक्षिसे निश्चित करण्यात आलेली आहेत.
1) तालुका पातळीवरील स्पर्धेत
प्रथम क्रमांकासाठी : ५,०००
द्वितीय क्रमांकासाठी : ३,०००
तृतीय क्रमांकासाठी : २,०००
2) जिल्हा पातळीवरील स्पर्धेत
प्रथम क्रमांकासाठी : १०,०००
द्वितीय क्रमांकासाठी : ७,०००
तृतीय क्रमांकासाठी : ५,०००
3) राज्य पातळीवरील स्पर्धेत
प्रथम क्रमांकासाठी : ५०,०००
द्वितीय क्रमांकासाठी : ४०,०००
तृतीय क्रमांकासाठी : ३०,०००