पाटण प्रतिनिधी । सातारा सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस अजूनही पडत असून पश्चिमेकडील कोयना धरणात दोन दिवसात पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दुपारी एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरणात 104.93 TMC इतका पाणीसाठा झाला आहे.
सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस अजूनही पडत असून पूर्व भागातील माण, खढ़ाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच ओढे खळाळून वाहत आहेत. तसेच पश्चिम भागातही पाऊस पडत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे 3 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात सुमारे 2,172 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यातच धरणातील पाणीसाठा 104.93 टीएमसी झाला आहे.
पाणीसाठ्याची टक्केवारी 99.68 झाली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. त्यातून १ हजार ५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरलाही 41 मिलिमीटरची नोंद झालेली आहे.
पाथरपूंजनंतर नवजा येथे सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद
जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत पाथरपूंजनंतर नवजा येथे सर्वाधिक 6 हजार 817 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यानंतर महाबळेश्वरला 6 हजार 611 आणि कोयना येथे 5 हजार 699 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पश्चिम भागातील कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख धरणे भरलेली आहेत. सध्या या सर्वच धरणांत 150 टीएमसीवर पाणीसाठा झालेला आहे.
Koyna Dam
Date: 17/10/2024
Time: 08:00 AM
Water level: 2163’03” (659.359m)
Dam Storage:
Gross: 104.93 TMC (99.70%)
Live: 99.81 TMC (99.68%)
Inflow : 2,172 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 03/5699
Navaja- 00/6817
Mahabaleshwar- 41/6611