कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील वराडे गाव परिसरात मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन बिबटे असल्याची दृश्ये कैद झाली होती. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता भाजपचे पदाधिकारी ॲड. महादेव साळुंखे यांनी आज थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. साहेब बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी साळुंखे यांनी केली. त्याच्या मागणीची दखल घेत त्यांना प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वराडे येथे तीन बिबटे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने तीन दिवसात गावातील अनेक श्वानावर हल्ला केला असल्यामुळे त्याच्या हल्ल्यानें अनेक श्वान मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसल्याने शिवाय वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त न केला जात असल्याने भाजप कराड उत्तरचे माजी अध्यक्ष ॲड. महादेव साळुंखे यांनी आज शुक्रवारी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनाच फोन केला. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांच्याशी त्यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी ॲड. महादेव साळुंखे यांनी गावात तीन बिबटे असून त्यांच्याकडून दहशत प्रसवली जात आहे. सलग तीन दिवस ते सीसीसीटीव्हीत दिसून येत आहेत.
बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वकिलाने केला थेट वनमंत्री मुनगुंटीवारांना फोन ! pic.twitter.com/pgqgnZdyIR
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 28, 2023
वराडे या ठिकाणी वन खात्याचे कार्यालय असून त्याठिकाणी वन्य जीवांचे रुग्णालय बनवायचे सुरु आहे. त्या रुग्णालयाभोवती तीन बिबटे फिरत आहेत. या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात तसेच या ठिकाणी पिंजरे लावून त्यांना तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी गावातील भाजप पदाधिकारी तथा ॲड. महादेव साळुंखे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्याच्या मागणीची दखल घेत मंत्री मुनगुंटीवार यांनी वन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत असल्याचे सांगितले.