कराड प्रतिनिधी | शिंदे गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तळमावले प्रतिक्रिया दिली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून काय अपेक्षा करायची? कारण सर्व काही सेटिंग झाली. मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचा राजकारण झालं तर असंच त्यांना वाचवलं जाणार, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे यांनी आज पाटण मतदार संघात तळमावळे येथे जाहीर सभा घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या सभेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपाला आपलं संविधान बदलायचंय. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे ते स्पष्ट झालं. अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला.
एवढी वर्षे जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते, तेव्हा कोणत्या पक्षप्रमुखांचे आदेश घेत होते. कोणत्या नेतृत्वाच्या तिकीटावर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवावं. लोकशाहीची भरदिवसा एवढी निर्लज्ज हत्या मी देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात कधीच पाहिली नाही. उलट तपासणी या खोके सरकारची आता लोकशाहीमध्ये जनता करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्त अपेक्षा जनतेकडून आहे.
लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेत. जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेले आहे.जगाला आता कळलेला आहे की आपल्या देशात लोकशाहीला मारलेला आहे आणि देशात हिटलर शाही सुरू झालेले आहे. या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल, असे ठाकरेंनी म्हटलं.