कराड प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगार (धोकादायक व्यक्ती) यांच्यावर कटोर प्रतिब्धक कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कराड शहर स्टेशन हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार कुंदन जालींदर कराडकर (वय २७, रा. गजानन हौसिंग सोसायटी,सैदापुर ता. कराड जि. सातारा) याच्याविरुद्ध MPDA कायदया अन्वये स्थानबध्द तेची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुंदन जालींदर कराडकर याच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव श्री. कोंडीराम पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेला होता. नमूद प्रस्तावाची पडताळणी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा अरुण देवकर, यांनी केली. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक,सातारा व अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड विभाग कराड यांचे मार्फतीने MPDA कायदया अन्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सातारा कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सातारा मा. श्री.जितेंद्र डूडी यांनी स्थानबद्ध इसमाने स्वतः तसचे साथीदारांच्या मदतीने मुत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा, मुत्यू किंवा जबर दुखापत यांची भितीघालून अपहरण करणे, जबरी चोरी करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन थाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोथ करण्याची पुर्व तयारी करुन गृहआगळीक करणे, दंगामारामारी करणे, चोरी करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, विनापरवाना शस्त्र बाळणे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवाना हददापार केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे, सुर्वास्त व सुर्वोदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत मिळ्न वेणे असे गुन्हेकेलेने तसेच स्थानबद्ध इसमाकडून सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व तो घोकादायक व्यक्ती झालेची खात्री झाली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी MPDA कायदयान्वये कुंदन जालींदर कराडकर (वय २७, रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापुर ता. कराड जि. सातारा) याला दि. ०८/o५/२०२४ रोजी पासून ०१ वर्ष करीता सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करणे बाबतचा आदेश पारीत करणेत आला असुन त्यास ताब्यात घेवुन सातारा जिल्हा मध्यवतीकारागृह येथे स्थानबद्ध करणेत आले आहे.
नोव्हेंबर २০२२ पासून १० मोक्का प्रस्तावामध्ये १२८ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत, म.पो.का.कलम ५५ प्रमाणे २५ उपद्रवी टोळयांमधील ८१ इसमांना, म. पो. का. कलम ५६ प्रमाणे २६ इसमांना, म.पो.का.कलम ५७ प्रमाणे ०३इसमांना असे एकुण ११० इसमांविरुध्द तडीपार सारखी तसेच MPDA कायदयान्वये ०२ इसमांवरूध्द स्थानवध्दतेची कारवाईकरण्यात आली आहे. भविष्यातही सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्दमोक्का, हृददपार, एम. पी. डी. ए. अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार आहेत.
पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख व आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, सातारा व त्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर विभाग कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी,पाटण सविता गर्जे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटीेल, पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संजय देवकुळे, कराड शहर पोलीस स्टेशन, पो. हवा. अमित सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखा,सातारा तसेच पोलीस शिपाई आनंदा जाधव, महिला पोलीस शिपाई सोनाली पिसाळ व कराड शहर डी. बी, पथकातील सर्वअंमलदार यांनी MPDA कायदयान्वये अंतर्गत कारवाई करणेसाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.