पोक्सो खटल्यातील आरोपीस 3 वर्ष सक्तमजुरीसह 1.5 हजार रुपये दंडाची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरून विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.व्ही. बोरा यांनी आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तानाजी दौलत भगत (वय ५८, रा. पिंप्रद ता. फलटण, जि. सातारा), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी तानाजी दौलत भगत याने २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अल्पवयीन पीडीत मुलीला त्याच्या राहत्या घरात नेऊन विनयभंग आणि अत्याचाराचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उप-निरीक्षक यु. एस. शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यात आरोपीस दोषी धरून न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील महेश शिंदे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून विषेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के.व्ही. बोरा यांनी आरोपीस शिक्षा सुनावली.