खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नागझरी (ता. कोरेगाव) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बाबू बापू जाधव (वय ३६, मूळ रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा. घटनेवेळी नागझरी) असे शिक्षा मिळालेल्याचे नाव आहे.

दिनांक २३/०५/२०२२ रोजी सकाळी ०९.४५ वा. चे सुमारास (नागझरी, ता. कोरेगांव, जि. सातारा) येथे आरोपी बाबु बापु जाधव (वय ३६, मुळ रा. नामदेववाडी झोपडपटटी, सातारा) घटनेवेळी (रा. नागझरी, ता. कोरेगांव) याने त्याची पत्नी सौ. वैशाली बाबु जाधव (वय ३२) हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचे डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारुन खुन केल्याचा रहिमतपुर पोलीस ठाणेस गु.र.क्रं.१०१/२२ भा.दं.वि.सं. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर घटनेवेळी आरोपीत बाबु जाधव यानेदेखील स्वतः त्याचे डोक्यात मारुन घेवुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केलेला होता. गुन्हयाचे तपासी अधिकारी रहिमतपुर पोलीस ठाणेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड व त्यांचे मदतनीस पोलीस अंमलदार दिपक देशमुख यांनी गुन्हयाचा सखोल व बारकाईने तपास केला. गुन्हयातील बारकावे हेरुन गुन्हयाशी निगडीत सर्व पुरावे प्राप्त करुन आरोपीत बाबु जाधव याचेविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

सदर गुन्हयाची मा. न्यायालयासमक्ष सुनावणी चालु होवुन रहिमतपुर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली सत्र न्यायालयातील पैरवी कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार विनोद मोरे यांनी मा. न्यायालयातील सदर गुन्हयाचे सुनावणीवेळी गुन्हयातील साक्षीदार यांना वेळोवेळी रहिमतपुर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांचेकडे ब्रिफिंग करुन घेवुन साक्षीदारांचे साक्षीवेळी मा. न्यायालयात उत्तम कामगिरी पार पाडली.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक २३/१०/२०२४ रोजी मा. न्यायालयाने सदरचा गुन्हा हा निकाली काढला असुन आरोपीत आरोपीत नामे बाबु बापु जाधव वय ३६ वर्षे, मुळ रा. नामदेववाडी झोपडपटटी, दै.ऐक्य प्रेसचे पाठीमागे, सातारा यास आजीवन कारावास व रु.५०००/- चा द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे.

सदरबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख सो, मा.अपर पोलीस अधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी सो श्रीमती सोनाली कदम यांनी रहिमतपुर पोलीस ठाणेचे गुन्हयाचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस अंमलदार दिपक देशमुख, विनोद मोरे यांचे अभिनंदन केले आहे.