सातारा-कास मार्गावर कुजलेला पालापाचोळा ठरतोय जीवघेणा; पावसाळ्यात दुचाकींचे घसरून अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा-कास मार्गावर काही ठिकाणी दुतर्फा झाडांचा पाला पडून पावसाच्या पाण्याने तो कुजल्याने घसरण निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांनी आपली वाहने जपून चालवणे आवश्यक आहे. पाल्यावरून दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात असताना दुचाकी घरून अपघात होत आहेत.

सातारा शहराच्या पश्चिमेस देश-विदेशात आपल्या विविधरंगी व दुर्मीळ फुलांच्या सौंदर्याची ख्याती पोहोचवणारे तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता व जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असणारे कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. कास पठार तसेच कास धरण परिसरात पर्यटनासाठी बहुसंख्य पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी होऊ लागली आहे. या परिसरात पर्यटक दुचाकी, चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर पर्यटनास येत आहेत. हा परिसर अतिपर्जन्याचा ओळखला जात असून, गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या स्वरुपात पाऊस पडत आहे. तसेच दिवसाही मोठ्या प्रमाणावर धुके पडलेले दिसून येत आहे.

जोरदार वारा व मुसळधार पावसामुळे दुतर्फा असलेल्या झाडांचा पालापाचोळा रस्त्याच्या दोन्ही बाजूस पडलेला दिसून येत आहे. रस्त्यावर पडलेल्या पाला पाचोळ्याचा खच सततच्या पावसाने कुजला असून घसरण निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेष करून दुचाकी वाहनचालकांनी आपली वाहने जपून चालवणे घसरण निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेष करून दुचाकी वाहनचालकांनी आपली वाहने जपून चालवणे आवश्यक आहे.