कराडातील तरूणास 65 हजाराच्या पिस्तुलासह अन्नपूर्णा हॉटेलसमोर अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अवैध पिस्टल बाळगणाऱ्या संशयितास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक केली. ओंकार श्रीकांत माने उर्फ के. के. (रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ओंकार श्रीकांत माने उर्फ के. के. हा गावठी पिस्टल बाळगुन चोरटी विक्री करण्याचे इराद्याने वारुंजी फाटा, हॉटेल अन्नपूर्णाच्या पुढील बाजूला NH.04 हायवे लगत थांबला आहे. त्यानंतर स्वतः के. एन. पाटील व सपोनि गणेश कड तसेच डीबी स्टाफ सर्व तयारी निशी दोन पंचांना सोबत घेतले.

त्यानंतर दि. 08 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. वारुंजी फाटा, हॉटेल अपूर्णाच्या पुढील बाजूस NH.04 हायवेलगत थांबून ग्राहकाच्या प्रतिक्षेत असलेल्या इसमांस पळून जात असतानाच झडप घालून ताब्यात घेतले. त्याचे नांव पत्ता विचारता त्याने आपले नांव ओंकार श्रीकांत माने उर्फ के. के. (वय 21, रा. कोष्ठी गल्ली, रविवार पेठ, कराड ) अशी माहिती दिली.

त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला पेंन्टमध्ये खोचलेल्या एक गावठी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल असा मुद्देमाल मिळून आला. सुमारे 65 हजार रुपयांचा मुद्देमाल एक अग्निशस्त्रांसह मिळून आलेने सरकार तर्फ पो. कॉ. आनंदा जाधव यांनी दिले तक्रारीवरुन कराड शहर पोलीस स्टेशनला गू. र.नं. 1092/2024 भा.शख का.क.3/25 म.पो. का. कलम 37.4 11.1.35 प्रमाणे दखलपात्र व गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीस 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरिक्षक श्री. गणेश कड. पो. हवा. शशिकांत काळे, पो.हवा, अशोक वाडकर, अमित पवार, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस अंमलदार आनंदा जाधव, मयूर देशमुख, अमोल देशमुख, मुकेश मोरे, धीरज कोरडे, संग्राम पाटील, दिग्विजय सांडगे, हर्षद सुखदेव, समिर पठाण, मोहसिन मोमिन, महेश पवार, महिला पोलीस अंमलदार सोनाली पिसाळ यांनी केली.

95 अवैध शस्त्र 199 जिवंत काडतुसे व 387 पुंगळ्या जप्त

पोलीस अधीक्षक समीर शेख हे सातारा जिल्ह्यात हजर झाले पासुन सातारा जिल्हा पोलीसांनी 95 अवैध शस्त्र 199 जिवंत काडतुसे व 387 पुंगळ्या जप्त केल्या आहेत. परराज्यातील तसेच स्थानिक तस्करांचे जाळे नेस्तनाबूत करण्यात यश मिळविलेले आहे. तसेच कराड शहर पो.स्टे.चे वपोनि श्री के. एन. पाटील यांनी कराड शहर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून जानेवारी पासून गत 7 महिन्याचे कालावधीमध्ये आत्तापर्यंत कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध शख बाळगणाऱ्या विरुत्व 7 कारवाया कराड शहर पोलीसांनी केलेल्या असुन 07 अवेध शख जप्त केलेली असून 09 आरोपींना अटक केली आहे.

अवैध शस्र बाळगणाऱ्यांवर वचक

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या उल्लेखणीय कामगिरीमुळे कराड व परीसरातील अवैध शस्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेही अवैध शस्रांच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवणार असलेचे के.एन. पाटील व सपोनि श्री. गणेश कड यांनी सांगितले आहे. अवैध शस्र बाळगणाऱ्यांवर वचक निर्माण करीत असलेची पावती कराड शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाने दिली आहे.