साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत चेंगराचेंगरी; तरुण पायाखाली चिरडला; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात काल गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डीजे आणि ढोल ताशांच्या ठेक्यावर तरुणाई नाचली. मात्र, रात्री विसर्जन मिरवणुकीत उसळलेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीत प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याने एक तरुण गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून त्या तरुणाला गर्दीतून सुरक्षित बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.

सातारा शहर व परिसरातील सुमारे १ हजार ६७३ सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे गुरुवारी मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. मंडळाकडून बाप्पांच्या विसर्जनासाठी भव्य-दिव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास राजपथावरील मोती चौक परिसरात एक घटना घडलाय. या ठिकाणी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. या गर्दीतून वाट काढताना अनेकांची दमछाक उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत गर्दीतील एक तरुण गुदमरून बेशुद्ध पडला.

ही घटना निदर्शनास येताच बंदोबस्तासाठी असलेले एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक अमित पाटील, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव, पोलिस हवालदार विजय कांबळे, शरद बेबले, पोलिस नाईक अविनाश चव्हाण, सूरज रेळेकर, चंद्रकांत टकले, प्रवीण फडतरे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी बाजूला करून तरुणाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.