सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. श्रीमती शीतल श्रीरंग देसाई वय (रा.चंदन नगर कोडोली सातारा) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदी पात्रात काल दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता आका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी बोरगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ठाण्यातील पीएसआय स्मिता पाटील, दीपक कारळे, नागठाणे बीट अंमलदार सहा. फौजदार प्रविण शिंदे, हवालदार अमोल गवळी, कॉ. लोहार याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेहाची ओळख पटवली.
संबंधित महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद दि. २२ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलीस या महिलेचा शोध घेत होते. या घटनेची फिर्याद मारुती श्रीरंग देसाई ( रा. चंदननगर कोडोली) यांनी दिली होती. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार अमोल गवळी अधिक तपास करत आहेत.