कार अपघातात महिला ठार, पाचजण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एक महिला ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींना येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी गुरु पौर्णिमेदिवशी घडली. देवदर्शनासाठी गुरु पौर्णिमेनिमित्त नाणीज या ठिकाणी कामोठे मुंबई येथील भोसले व मोरे कुटुंबीय आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते पार निघाले असताना हा अपघात झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कामोठे मुंबई येथील भोसले व मोरे कुटुंबातील सहा जण गाडी (क्रमांक MH 03 CS 8009) मधून कामोठे मुंबई देवदर्शनासाठी गुरु पौर्णिमेनिमित्त नाणीज या ठिकाणी गेले होते. मुंबईला परत जाताना ओंड गावच्या हद्दीत त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातातील जखमींना तात्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले. जखमींना कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.