कराड प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते मलकापूर हद्दीत सध्या पूल पाडण्यात आला असून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सारखी वर्दळ राहत आहे. मलकापूर शहराच्या हद्दीतील
हॉटेल धनी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात महिला जागीच ठार झाली.
अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव सिध्दी कोळी (वय 36, रा. पलूस, जि. सांगली) असून कंटेनर चालकास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामर्गावर सिद्धी कोळी रस्ता ओलांडत होत्या. यावेळी कोल्हापूरहून सातारच्या दिशेने कंटेनर क्रमांक (MH-11- BL- 6379) हा निघाला होता. यावेळी सिद्धी कोळी या रस्ता ओलांडत असताना महामार्गाच्या रस्त्यावरून भरधाव वेगाने संबंधित कंटेनर आला. आणि कंटेनरने जोरात सिद्धी काळे यांना चिरडले. या अपघातामुळे त्या ठिकाणी अचानक महामार्गावरील वाहतूक थांबली.
भरधाव कंटेनरने रस्ता ओलंडणाऱ्या महिलेस चिरडले
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत अपघात pic.twitter.com/AFOlsS08Iz
— santosh gurav (@santosh29590931) June 14, 2023
या अपघाताची माहिती नागरिकांनी कराड शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी कराड शहर अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी प्रशांत जाधव, धीरज चतुर, महाडिक यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी थांबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत केली. तसेच कंटेनर चालकास ताब्यात घेतले. संबंधित महिला सांगली जिल्ह्यातील असून ती याठिकाणी कशासाठी आली होती? यांचा अधिक तपास कराड शहर पोलिसांकडून केला जात आहे. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.