पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी 24 तासांत नवजाला सर्वाधिक 2 हजार 454 मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात 44.06 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिले. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. तरीही या पावसात सातत्य नाही. कधी पावसाचा जोर राहतो. तर काहीवेळा उघडझाप सुरू असते. त्यातच चार दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले. सध्या तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी आहे. त्यामुळे धरणातील साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.
गुरुवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त 86 मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला 116 मिलीमीटरची नोंद झाली आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगरला आतापर्यंत 2 हजार 87 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 1हजार 875 मिलीमीटर पाऊस पडला. नवजाला 2 हजार 454 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा महाबळेश्वरच्या पावसाचे प्रमाण कमी आहे. तर कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे.
Koyna Dam
Date: 18/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2100’05” (640.207m)
Dam Storage:
Gross: 44.06 TMC (41.86%)
Live: 38.94 TMC (38.89%)
Inflow : 11,321 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 86/2087
Navaja- 116/2454
Mahabaleshwar- 71/1875