एसटी बसची दुचाकीस जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड- चांदोली मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. कराड तालुक्यातील काले गावानजीक ही अपघाताची घटना घडली असून या घटनेनंतर पाेलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बाबासाहेब भोसले असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत पाेलीसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कराड – चांदोली रस्त्यावर काले गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक MH ४० AQ ६३६९) ने दुचाकी क्रमांक (MH ५० H ३९३५) ला जोराची धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस्वार खाली पडला. यावेळी दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातामुळे काही काळ कराड चांदाेली मार्गाची वाहतुक खाेळंबली होती. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून त्यांच्याकडून अपघाताचा तपास केला जात आहे.