कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील हजारमाचीचे उपसरपंच तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रशांत यादव यांच्याविरोधात तहसिलदार विजय पवार यांच्याकडे अविश्वास दर्शक ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंचांसह 14 सदस्यांनी उपसरपंचांवर अविश्वास दर्शक ठराव आणला आहे. हा आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे.
हजारमाची ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 14 सदस्यांनी नुकतीच कराडचे तहसिलदार विजय पवार यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. यावेळी सरपंच विद्या घबाडे, सदस्य कल्याणराव डुबल, शरद कदम, अवधुत डुबल, संगीता डुबल, सोमनाथ सुर्यवंशी, जयश्री पवार, सीता माने, पितांबर गुरव, पूनम रामुगडे, विनोद डुबल, सारिका लिमकर, निर्मला जिरगे, ऐश्वर्या कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.
अविश्वास दर्शक ठराव दाखल झाल्यानंतर तहसिलदार विजय पवार यांनी सर्व सदस्यांना गुरूवारी (दि.12) रोजी विषेश सभेस उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. नोटीसीत म्हटल्याप्रमाणे सदस्य कल्याणराव डुबल व इतर 13 सदस्यांनी उपसरपंच प्रशांत यादव यांच्याविरूद्ध समक्ष अविश्वास दर्शक ठराव दिला आहे. या ठरावाच्या अनुशंगाने गुरूवारी (दि. 12) दुपारी 12 वाजता हजारमाची ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. स्वता तहसिलदार विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असल्याचे नोटीशीत म्हटले आहे.