सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील निसराळे ते जावळवाडी रस्त्यावर बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले. रविवारी रात्रीच्या सुमारास या मार्गावरून निघालेल्या चारचाकी वाहनासमोर बिबट्या आवा आला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील निसराळे गावातील कमानीच्या समोरून आणि त्या परिसरातील शिवारात तसेच वारणानगर ते जावळवाडी येथील रोडवर अनेक दिवसांपासून बिबट्या वाहनचालकांच्या निदर्शनास पडत आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना बिबट्या आणि बिबट्यांची मादी व तिचे बछडे पिल्ले दिसून आल्याने त्यांच्यामध्ये खबराटीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, या बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, वाहनधारक, शाळकरी मुलांना, तसेच मजूर देखील दिवस एकटे या मार्गावरून शेत शिवारात तसेच परिसरातील गावात जाण्यास भीत आहेत. काल निसराळे ते जावळवाडी मार्गावरून रात्रीच्यावेळी काही चारचाकी वाहनाने कहैलोक जात असताना त्यांच्या गाडीसमोर बिबट्या आडवा गेला. या मोकाटपणे फिरत असलेल्या बिबट्याचा वनविभागाने शोध घेऊन या परिसरातील शेतकरी व त्यांच्या पाळीव प्राण्यांना , ग्रामस्थ, मजूर, वाहनधारक, शाळकरी मुले यांना भयमुक्त अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.