कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीसांनी २ वर्षांकरिता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर (वय २६) तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, (वय २१, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता. कराड) अशी गून्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तडीपाराची कारवाई केलेल्या कराड शहरातील दोघांच्यावर सातारा जिल्हयामध्ये टोळीने बेकायदेशीर जमाव जमवुन दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणेबाबतचे शरिराविरुध्दचे बरेचसे गुन्हे केले आहेत. त्याबद्दल त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पी.बी. सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगांव तालुक्यातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती.
यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पुर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगांव तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन १६ उपद्रवी टोळयांमधील ५१ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाणेचे सफौ संजय देवकुळे, पोकों आनंदा जाधव.म.पोकॉ सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.