कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विरवडे येथील एका जागेच्या मालकीच्या वादातून बुधवारी सकाळी दोन गटांत मारामारी झाल्याची घटना घडली. यावेळी मारामारीत जखमी झालेल्या काही लोकांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड शहर पोलिसांत याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वीरवडे येथील एका जागेच्या मालकीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. मागील दोन ते महिन्यांपासून या जागेवरून अधिक धुसफूस वाढली होती. बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या धुसफुसीचे रूपांतर मारामारीत झाले. या मारामारीत दोन्ही गटांतील काही लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची तसेच एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती उपजिल्हा मिळाल्यानंतर रुग्णालय व कऱ्हाड शहर पोलिस स्टेशन समोर लोकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हे – दाखल करण्याचे काम सुरू होते.