‘थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,’ असे म्हणत उपनगराध्यक्षासह दोघांकडून एकावर जीवघेणा हल्ला;

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । “थांब, तुझा आता कार्यक्रमच करतो,” असे म्हणत तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाटण येथे आज गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पाटण नगरपंचायतीचा उपनगराध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. मारहाण प्रकरणातील तिघेजण फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

1) सागर दादासो पोतदार (वय ४०, रा. जुना स्टैंड, पाटण, 2) धनाजी कदम (वय २४, रा. जुना स्टैंड, पाटण, 3) ओम खेरमोडे (सिद्धे) (वय २२, रा. झेंडाचौक ता पाटण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रदीप शामराव सुतार (वय ५३, रा. मार्केट यार्ड रोड, ता. पाटण यांनी फिर्याद दाखल केलेली आहे.

दरम्यान, फिर्यादी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज गुरुवार, दि. ०५/१०/२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास प्रदीप सुतार हे त्यांच्या दुचाकीवरून चाफोली रोड पाटण येथे पार्सल आणण्यासाठी गेले होते. तेथील पार्सल घेवून परत येताना भारत बझार पाटण समोरून सायकलवरून जाताना उपनगराध्यक्ष सागर पोतदार याने आडवले. त्यावेळी त्याच्यासोबत धनाजी कदम व आणखी दोघेजण होते. सागर पोतदार प्रदीप सुतार यांना शिव्या देत तुझा आज कार्यक्रम करतो,” असे म्हणत हातातील रॉडने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

या हल्ल्यात सुतार यांच्या हातातील डोक्यात मार लागला. त्यावेळी सुतार यांनी त्यांचा डावा हात आडवा धरत प्रतिकार कर्ला असता हाताच्या पोटरीवर त्यांना मार लागला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या धनाजी कदम याने सुतार यांच्या डोक्यात बादली घातली. त्यावेळी खैरमोडे (सिद्धे )याने देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता. सुतार यांनी “वाचवा वाचवा” म्हणून जोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिघांनी त्याच्याभोवती एकत्रित येत मध्यभागी घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

‘तुला मारून टाकतो, असे म्हणत त्यांना आमारहाण केली. यामध्ये सुतार हे बेशुद्ध पडले. या घटनेनंतर संबंधित मारहाण करणारे तेथून निघून गेले. या घटनेनंतर मारहाण झालेल्या सुतार यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सुतार यांच्या डोक्यात, पाठीवर, पायावर व हातावर मारहाणीचे व रॉडने मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सागर दादासो पोतदार (वय ४०, रा. जुना स्टैंड, पाटण, २) धनाजी कदम (वय २४, रा. जुना स्टैंड, पाटण, ३) ओम खेरमोडे (सिद्धे) (वय २२, रा. झेंडाचौक ता पाटण) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पाटील करीत आहेत.