सातारा जिल्ह्यातील ‘या’ सहकारी पतसंस्थेत 50 लाखांचा घोटाळा; चेअरमनसह 17 संचालकांविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात पतसंस्थांची मोठ्या संख्येने उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी व महिला आपले पैसे ठेवतात. या ठिकाणी पैसे ठेवल्यास आपले पैसे सुरक्षित राहतील असा विश्वास असतो. मात्र, काहीवेळा अनुचित प्रकारही घडतात. असाच फसवणुकीचा प्रकार सातारा जिल्ह्यातील सिध्दनाथ सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी येथील पतसंस्थेत घडला आहे. येथील पदाधिकाऱ्यांनी आपआपसात संगणमत करून 50 लाख रुपयांची पसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये चेअरमन संचालकांचा समावेश आहे. सुनील पोळ, सुरेश इंगळे, सुशिला पोळ, सुरेश जाधव, सुरेश जगताप, निलीमा पोळ, पदाजा देशमुख, नारायण माने, अँड, राजीव काळे, बाळासो काटकर, महादेव गोंजारी, मालोजी मोरे, राजुकमार जगताप, संदीप इंगारे, रणजित पोळ यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गिरीश नारायण कुलकर्णी (वय 59, रा.गुरुवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 4 सप्टेंबर 2020 ते दि. 9 सप्टेंबर 2020 या कालावधीत आर्थिक घोटाळ्याची घटना घडलेली आहे. तक्रारदार गिरीश कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते 2001 साली सिध्दनाथ सहकारी पतसंस्थेचे सभासद झाले आहेत. तसेच या पतसंस्थेत 2002 से 2004 या कालावधीत ते संचालक म्हणून काम पाहिले. या पतसंस्थेत त्यांनी मालतारण व बचत अशी दोन खाती उघडली.

या पतसंस्थेत 2016 साली त्यांनी 50 लाख रुपयांचे मालतारण कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड सुरु आहे. दरम्यान, संशयितांनी पहिल्या कर्ज मंजूरीसाठी त्यांनी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करून नव्याने कर्ज मागितले नसताना ते मंजूर करून संबंधित रक्कम संशयितांनी घेऊन फसवणूक केली. याबाबत माहिती समजल्यानंतर गिरीश कुलकर्णी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनंतर व कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.