सातारा प्रतिनिधी । उसाच्या फडात धारधार शस्त्राने सपासप करण्यात आलेल्या वारामध्ये एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी घडली. तालुक्यातील भाडळे खोऱ्यात असलेल्या हिवरे गावातील विक्रम विजय खताळ (वय १३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह उसाच्या फडात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आढळून आला. खुनामागचे नेमके कार्म मात्र, अजूनही अस्पष्ट आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील विक्रम खताळ याचा शनिवारी भाडळे खोऱ्यात एका ऊसाच्या फडात काही शेतकऱ्यांना मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. याचाही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.
याचाही माहिती पोलिसांना समजल्यानंतर वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाले. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे.