कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उद्या उघडणार; 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार

0
814
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढला असून धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा 74.29 टीएमसी इतका झाला असून धरणाच्या दरवाजाला पाणी लागले आहे. त्यामुळे उद्या दि. १५ जुलै २०२५ रोजी ठीक सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून ५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे. कोयना धरणात दरवाजे उघडून वरून 5000 आणि पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक असा एकूण 7100 क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू होईल.

कोयना धरणात आज सोमवार सकाळी आठ वाजेपर्यत आलेल्या आकडेवारीनुसार कोयनानगर येथे 33, नवजा 62 आणि महाबळेश्वरला 42 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे 2 हजार 227, नवजा 2 हजार 68 आणि महाबळेश्वरला 2 हजार 126 मिलिमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाण्याची आवक देखील होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात 10 हजार 674 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 74.29 टीएमसी झालेला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी धरणाच्या दरवाजाला स्पर्श करू लागले असल्यामुळे उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्या दि. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून ५००० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात दरवाजे उघडून वरून 5000 आणि पायथा वीजगृहातील दोन्ही जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक असा एकूण 7100 क्युसेक विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू होईल.

कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. तसेच कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणातून पाण्याचा अतिरिक्त विसर्ग केला जाणार आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कोयना नदीच्या काठावर वसलेल्या गावांना धोका होऊ शकतो त्यामुळे नदीपात्रात कोणीही जाऊ नये. तसेच नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

उद्याच कोयना धरणातून पाण्याचा अतिरिक्त विसर्ग होणार

सध्या कोयनेचा जलसाठा 74.29 टीएमसी (अब्ज घनफूट) असून, धरणाच्या दरवाजाला पाणी टेकले आहे. त्यामुळे दरवाजातून पाणी सोडण्यासाठी धरण व्यवस्थापन सतर्क आहे. उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती पाटण तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

Koyna Dam

Date: 14/07/2025
Time: 08:00 AM
Water Level: 2134’09” (650.672m)
Water Storage: 74.29 TMC (70.58%)
Inflow: – 10,674 cusecs (0.92 TMC)
2100 cusecs discharge from Piththa Graha into Koyna river basin is underway
Rainfall min mi (today/total)
Koyna 33/2227
Navaja 62/2068
Mahabaleshwar 42/2126