बनावट तणनाशक औषधे तयार करणाऱ्या टोळीतील सहाजणांना अटक; 12 लाख 59 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

0
1561
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बनावट तणनाशक औषधे तयार करणाऱ्या टोळीतील सहाजणांना अटक करण्यात सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. दरम्यान, आरोपीना अटक करण्यात आल्यानंतर कोरेगाव तालुकयातील रेवडी, फलटण व वडूज येथील कारखान्यातून एकूण १२ लाख ५९ हजार ३७० रुपयाचे बायरकंपनीचे बनावट राऊंडअप औषधे, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

१) धैर्यशील अनिल घाडगे (वय ३१, रा. जीएफ ३ साई वैष्णव अपार्टमेंट समता कॉलणी शाहपुरी सातारा,) २) युवराज लक्ष्मण मोरे (वय २८, रा. रेवडी ता. कोरेगाव जि.सातारा), ३) गणेश मधुकर कोलवडकर (वय ३०, रा. धालवडी, ता.फलटण जि. सातारा), ४) निलेश भगवान खरात (वय ३८, रा. जाधववाडी ता.फलटण जि.सातारा) ५) तेजस बाळासो ठोंबरे (वय 3०, रा. वडूज ता. खटाव जि.सातारा), ६) संतोष जालिंदर माने (वय ४५, रा. नडवळ ता. खटाव जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरामधील करंजे नाका येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काहीलोक चारचाकी गाडीतुन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांना ,दलाली. त्यांनी वरिष्ठ कार्यालयास याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. ढमाळ व डीबी पथक यांचे पथक तयार करुन त्यांना संबंधित टोळीवर कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यावेळी बनावट औषधांची खात्री करणेकरिता टू बडी कन्सलट्टींगप्रा.लि. कंपरनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश तानाजी पिसाळ यांना सोबत घेऊन करंजे नाका येथे रापळा लावला.

यावेळी करंजे नाका येथे मोळाच्या ओडाबाजुकडून आलेला एक टेम्पो थांबवून चालकाची चौकशी करण्यास सुरुवात केली. चालकासोबत बोलत असताना त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने पथकातील कर्मचारी व टू बडी कन्सल्टींगप्रा.लि. कंपनीचे असिस्टंट मॅंनेजर सतीश तानाजी पिसाळ यांचे मदतीने गाडीमध्ये असलेल्या औषधांची तपासणी केली. औषध तपासल्यानंतर ती बनावट असल्याची खात्री झाली. त्यानंतर संबंधित गाडी चालकांसह गाडी ताब्यात घेतली.

सदर जप्तीच्या कारवाईनंतर शाहुपूरी पोलीस ठाणेस गु. र. नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ३१८(४) कॉपी राईट कायदा १९९९ चेकलम ६३,६५ ट्रेड मार्कि कायदा १९९९ चे कलम १०३,१०४ प्रमाणे गुनहा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीनंतर रेवडी, फलटण व वडूज येथील कारखान्यातून एकुण १२ लाख ५९ हजार ३७० रुपयाचे बायरकंपनीचे बनावट राउन्डअप औषधे व चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा तपास चालु असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले, पोलीस निरीक्षिक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. देरे, पोलीस उपनिरीक्षक ढमाळ व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे, जयवंत घोरपडे यांनी केली आहे.