पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चिपळूण-कराड मार्ग सुरू

0
397
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला चिपळूण कराड हा मार्ग आहा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चिपळूण-कराड मार्गावरील वाजेगाव येथे पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाहतूक ठप्प झालेली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने बुधवारपासून हा मार्ग एस.टी. बसेस आणि लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. अद्याप अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

पाटण तालुक्यातील वाजेगाव येथील नाल्यावरील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करणे गरजेचे होते. काम असुर असताना वाहतुकीला अडथळा नको म्हणून संबंधित ठेकेदाराने नाल्यातूनच एक तात्पुरता रस्ता तयार केला होता. मात्र, दि. 17 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा भराव वाहून गेला आणि चिपळूणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा कुंभार्ली घाट मार्ग पूर्णपणे बंद झाला. सुरुवातीला 48 तासांत डागडुजी करून केवळ खासगी छोट्या वाहनांना प्रवेश देण्यात आला होता. हा मार्ग बंद झाल्याचा सर्वाधिक फटका एस.टी. महामंडळाला बसला आहे.

बुधवारी सकाळपासून उत्तर रत्नागिरीतील आगारांच्या एस.टी. बसेस कुंभार्ली घाटमार्गे कोयना, पाटण, कराडकडे रवाना झाल्या. पंधरा दिवस उलटले तरी चिपळूण-कराड मार्ग सुरू होत नाही. याची दखल येथील स्थानिक आमदार शेखर निकम यांनी घेतली आणि मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी पर्यटन मंत्री व पाटणचे स्थानिक आमदार शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन हा रस्ता तत्काळ सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करा, अशी विनंती केली आणि यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.