मुसळधार पावसामुळे उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडले

0
574
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेली दोन दिवस उघडझाप करणार्‍या पावसाने सोमवारी सकाळपासून पुन्हा जोर वाढवला. रविवारी रात्रभरही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच राहिल्या. पश्चिमेकडे धरण पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी उरमोडी धरणाचे चारही दरवाजे उघडून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातीळ पाणी पातळी वादळी असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा प्रथमच मी महिन्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली. यंदा पावसाने नको नकोसे केले पावसामुळे मशागतीची कामेहीवेळेवर करता येता आली नाही. त्यामुळे बहुतांश पेरण्या रखडल्या. पेरणीसाठी आणलेले बियाणे तसेच राहिल्याने शेतकरी देखील चिंतेत आहे. 15 मेपासून यंदा पावसाने सुरुवात केली ती आज पर्यंत कोसळत आहे. उघडझाप करणारा पाऊस शेतात वापसा येवू देत नाही. गेले दोन दिवस अधूनमधून पावसाने उघडीप दिली तरी पुन्हा येणार्‍या पावसाच्या सरी जनजीवन चिंब करत आहेत.

पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड, पाटण या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारीही ही संततधार कायम राहिल्यामुळे उरमोडी धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे प्रकल्पात पाण्याची वाढ होत आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले वक्र दरवाजातून 1500 क्युसेक तर जलविद्युत प्रकल्पातून 500 क्युसेक विसर्ग करण्यात आला. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढत आहे. हे पाणी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.