कराडात जुन्या भांडणातून युवकावर ब्लेडने वार; संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना

0
741
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहरातील बसस्थानका कडून साईबाबा मंदिर ते भेदा चौक जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री नऊच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकावर ब्लेडने वार करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयितांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.

आकाश शंकर रसनकुटे (वय २१, रा. सैदापूर, ता. कराड, मूळ रा. तासगाव, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील सैदापूर येथील आकाश रसनकुटे हा बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील साईबाबा मंदिराजवळील टायर दुकानासमोर उभा होता.त्यादरम्यान त्याचा मित्र राज लक्ष्मण होवाळ (रा. रुक्मिणीनगर झोपडपट्टी, कराड) दुचाकीवरून त्याठिकाणी आला.

त्याने जुन्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आकाशच्या गळ्यावर व छातीवर ब्लेडने वार केले. त्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.