सातारा प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त सातारा येथील गोळीबार मैदान याठिकाणी असलेल्या विश्वकर्मा हौसिंग सोसायटीच्या वतीने विश्वकर्मा मंदिरात नुकताच महिलांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला दिनानिमित्त स्विय सहाय्यक महसूल विभाग मंत्रालय मुंबईच्या शुभांगी विजय राजगुरू यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.
यावेळी परळी गावच्या महिला सरपंच हेमलता नथुराम सुतार,म्हसवे गावच्या महिला सरपंच सौ. मनिषा दीक्षित यांच्या हस्ते विश्वकर्मा मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रवचनकार श्री. तुकाराम सुतार (महाराज), पत्रकार श्री. रवींद्र सुतार, श्री. आबासाहेब महामुनी, श्री. ऋषिकांत सुतार, सातारा जिल्हा औद्योगिक सहकारी संस्थांचे फेडरेशनचे संचालक श्री. सतीश संपतराव सुतार, श्री. शिवाजीराव सुतार नाना, सातारा जिल्हा पांचाळ सुतार समाज मंडळ कोंडवे सातारा येथील संचालक श्री. अमोल सुभाषराव दीक्षित, कराड तालुका विश्वकर्मा जयंती नियोजक श्री. चंद्रकात सुतार, अध्यक्ष श्री. सुनील दीक्षित, सचिव श्री. दीपक सुतार, प्राध्यापिका सौ. मीना महामुनी ( सुपनेकर), सौ. योगिता सुतार, सौ. सुनीता सुतार, सौ. सुवर्णा दीक्षित, सौ. तेजश्री सुतार, सौ. ज्योती सुतार, सौ. उज्वला सुतार यांच्यासह महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
यावेळी श्री. तुकाराम सुतार महाराज यांनी स्त्री शक्ती या विषयावर महिलांसमोर प्रवचन सादर केले. त्यांच्यानंतर आयोग्य शिक्षिका कल्पना अरुण सुतार यांनी रोग्याची काळजी कशी घ्यावी? यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, महिला दिनानिमित्त सातारा जिल्हा सुतार समाज महिला आघाडी स्थापन करण्यात आली.