कराड प्रतिनिधी । कोयना धरणग्रस्तांचे गेल्या ६४ वर्षांत पुनर्वसनाचे संपूर्ण काम झालेले नाही. अनेकदा आंदोलने, मोर्चे काढूनही न्याय मिळत नसल्याने या धरणग्रस्तांनी बुधवारी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी प्रीतिसंगम बागेसमोर आत्मक्लेश आंदोलन केले.
कोयना धरण झाल्यानंतर पुनर्वसन प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. मात्र, या प्रकल्पात बाधित झालेल्या नागरिकांचे आजतागायत संपूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. वेळोवेळी सरकार दरबारी निवेदने देत आंदोलनाचाही मार्ग पत्करला. मात्र, तरीही सरकारने याकडे दुर्लक्ष केले. धरणग्रस्तांची तिसरी/चौथी पिढी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याने तो आम्हाला मिळावा, यासाठीच हे आंदोलन माहिती आंदोलनकांच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी आंदोलन करणार असल्यांचे जाहीर केल्याने धरणग्रस्तांसाठी लढणाऱ्या संग्राम संघटनेचे नेते चैतन्य दळवी यांना कराड पोलिसांनी आंदोलन करण्यापूर्वी रात्रीच ताब्यात घेतले आहे.