सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खूशखबर; फेब्रुवारी-मार्च महिन्याचे पैसे ‘या’ तारखेला मिळणार!

0
1950
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजने (Ladaki Bahin Yojana) च्या माध्यमातून दरमहा १५०० रुपये मिळतात. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे रखडलेला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी १५०० या प्रमाणे ३ हजार रुपयांची रक्कम ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनादिवशी या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४५१ हुन अधिक लाडक्या बहिणींची संख्या आहे. या लाडक्या बहिणींसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती. आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्याच्या हप्त्याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याची घोषणा आदिती तटकरे यांनी विधान सभेबाहेर केली आहे.

सातारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी

सातारा तालुका : ७६ हजार ४११ लाभार्थी
जावली तालुका : २० हजार ८४३ लाभार्थी
कोरेगाव तालुका : ५० हजार ५८० लाभार्थी
माण तालुका : ३४ हजार ८८५ लाभार्थी,
खटाव तालुका : ४८ हजार ८६८ लाभार्थी
वाई तालुका : ३६ हजार ७२५ लाभार्थी
खंडाळा तालुका : २३ हजार ८३२ लाभार्थी
महाबळेश्वर तालुका : १० हजार ५६९ लाभार्थी
फलटण तालुका : ५८ हजार ३७७ लाभार्थी
पाटण तालुका : ५९ हजार ११४ लाभार्थी
कराड तालुका : ९८ हजार २४७ लाभार्थी
एकूण लाभार्थी : ५ लाख १८ हजार ४५१
एकूण जमा झालेली रक्कम : ७७ कोटी ७६ लाख ७६ हजार ५०० रुपये

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

दि. ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे. महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ८ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना देण्यात येईल. ५-७ तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी हे पैसे दिले जाणार आहे. अडीच कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे. मागच्या महिन्यात २ कोटी ३५ लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. या महिन्यातही अडीच लाख महिलांना हप्ता मिळणार आहे. महायुतीचं सरकार सक्षम आहे. आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता ८ तारखेला येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरु होईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) म्हटले आहे.