सातारा प्रतिनिधी । पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये २६ फेब्रुवारीच्या पहाटे बस डेपोमध्ये फलटणला जाणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीवर उभ्या शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. सध्या संबंधित तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून अत्याचार करणारा आरोपी फरार आहे. या अत्याचार प्रकरणाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी मोठं विधान केले आहे. “शक्ती कायदा सुधारणा करून लवकरच राज्यात लागू होईल आणि अशा अत्याचाऱ्यांवर कडक कारवाई होईल. स्वारगेट अत्याचार प्रकरणात तर सीसीटीव्ही कॅमेरामुळे गाडे नावाच्या आरोपीची ओळख पटली आहे, लवकरच आरोपीला पोलीस पकडतील, असे मंत्री शिवेंद्रसिहराजे यांनी म्हंटले.
सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोलापूर येथे आज म्हयमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी पुण्यात अशीच एक घटना घडली होती, त्यावेळी तर पोलिसांकडे काहीच पुरावे नव्हते. तरीसुद्धा पोलिसांनी तांत्रिक तपास करत, संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. स्वारगेट अत्याचार प्रकरणात तर सीसीटीव्ही कॅमेरामुळे गाडे नावाच्या आरोपीची ओळख पटली आहे. भारतात कायदा आणखीन कायदा कडक व्हायला पाहिजे.थोर आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर कडक कारवाई होईल त्यांना तुरुंगात घातलंच पाहिजे.जेणेकरून अशी विधान करणाऱ्यावर चपराक बसली पाहिजे, असे देखील मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले म्हणाले.
पोलिसांची १३ पथके घेत आहेत शोध
पुण्यातील स्वारगेट प्रकरणात आरोपीच्या शोधात सध्या पोलिसांची १३ पथके कार्यरत आहेत. आरोपी शेतात लपून बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट येथील बस स्थानकाच्या येथे भेट देत पोलिसांशी चर्चा केली.