उंच भरारी योजनेतून 51 युवक प्रशिक्षणासाठी रवाना; आतापर्यंत 911 जणांनी घेतलाय योजनेचा लाभ

0
93
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि जिल्हा पोलीस दलांतर्गत सुरु असलेल्या ‘उंच भरारी’ या योजनेतून शुक्रवारी 51 युवक नुकतेच प्रशिक्षणासाठी रवाना झाले. गेल्या दोन वर्षापासून बेरोजगार युवक-युवकांसाठी सुरु असलेल्या योजनेतून आतापर्यंत 911 जणांनी लाभ घेतला आहे.

सातारा जिल्ह्यातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी पोलीस दलाने ही योजना सुरु केली आहे. 18 ते 35 या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधून आवडीनुसार नोकरी, रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. दुचाकी मॅकेनिक, चारचाकी मॅकेनिक, असिस्टंट इलेक्ट्रीशियन, प्लंबींग या कोर्सचे प्रशिक्षण दिले जात आहे.

शुक्रवारी पुसेगाव 12, वाई 7. वडूज 5, सातारा तालुका व भुईंज प्रत्येकी 4, दहिवडी, बोरगाव, कराड तालुका प्रत्येकी 2, रहिमतपुर, फलटण ग्रामीण, पाटण, ढेबेवाडी, व मसुर प्रत्येकी 1 असे वरील पोलीस ठाणे यांनी युवकांना एकत्र करुन एकूण 51 प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.