पाटण प्रतिनिधी | सहा दशकांपूर्वी कोयना खोर्यात झालेल्या विनाशकारी भूकंपाची झळ बसलेल्या पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्त व त्याच्या वारसांना दाखले वाटपाचा अखेर मुहूर्त लागला. भूकंपग्रस्त व त्यांच्या वारसांना नुकतेच भूकंपग्रस्त दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, यावेळी हेळवाकचे मंडलाधिकारी श्री. संजय जंगम, महसूल अधिकारी श्री. शशिकांत बोबडे, श्री. भरत जाधव, श्री. संतोष जाधव, श्रीमती पूजा दळवी तसेच महसूल सेवक श्री. जगन्नाथ सपकाळ, श्री. उदय राऊत, श्री. किसन जाधव, श्री. अरुण चाळके, श्री. अजित सुर्वे, श्री. प्रशांत सपकाळ, पत्रकार श्री. विजय लाड, श्री. लहूराज कदम, विभागातील नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.
भूकंपग्रस्थांना शासकीय नोकरीकामी दाखले देण्यात येतात. संपूर्ण पाटण तालुका भूकंपप्रवण क्षेत्र असला तरी अनेकांनी भूकंपग्रस्त दाखले काढलेले नाहीत. त्यामुळे मागणीप्रमाणे भूकंपग्रस्त दाखले देण्याचे धोरण तालुका प्रशासनाने आखले आहे. प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनंत गुरव यांनी भूकंपग्रस्तांना दाखले देण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.