सातारा प्रतिनिधी | सर्पदंश झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शशिकला मारुती जाधव (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) असे महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शशिकला मारुती जाधव (रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) यांना सर्पदंश झाल्याने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलिस हवालदार पोतेकर करीत आहेत.