अल्पवयीन पोराला दुचाकी दिली तर पालकावर गुन्हा; अनेक अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहनांचा वापर

0
138
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पूर्वी दहावी, बारावी पास झाल्यानंतर मुला-मुलींना सायकल भेट दिली जात होती. आता बरेच पालक मुला-मुलींना दुचाकी, मोपेड भेट देतात; परंतु १६ वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालवण्यास देऊ नये याची कायद्यात तरतूद आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार १८ वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालवता येत नाही; परंतु बरेच पालक हौसेखातर मुलांच्या हातात गाडीची चावी देऊन कौतुक केले जात आहे. अशा कौतुक करत अल्पवयीन मुलांना उचकी तसेच चारचाकी गाडी चालवण्यास देणाऱ्या पालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या वर्षभरात सातारा जिल्ह्यामध्ये चार पालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अनेक अल्पवयीन मुले-मुली दुचाकी चालवताना पकडले गेले आहेत, यामुळे पोलिसांनी पालकांवर कारवाईची चळवळ सुरू केली आहे. अल्पवयीन मुलांना महागड्या रेसर गाड्या देण्याच्या पालकांच्या प्रवृत्तीमुळे हे धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्या आहेत.

अल्पवयीन मुले शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी वापरतात, परंतु यामुळे वाहतुकीचे नियम मोडले जातात आणि अपघाताच्या घटना वाढत आहेत. या अल्पवयीन चालकांकडून बेजबाबदारपणे वाहन चालवले जाते, ज्यामुळे इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. मुलींचाही यात समावेश असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते.

अल्पवयीन मुला-मुलींना वाहन देऊ नका...

पालकांडून १८ वयापेक्षा कमी असलेल्या आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी दिली जात आहे. अशा अल्पवयीनांकडून वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत. यामुळे अपघात वाढत आहेत. तसेच वाहनाचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामध्ये मुलींचाही समावेश असल्याचे दिसून येते. वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघातासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींना वाहन देऊ नका, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास पालकांविरुद्ध कारवाई

मोटार वाहन कायदा १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १८ वर्षाखालील वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकास शिक्षेची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘५० सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम १८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी १८ वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही असे वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, आई-वडिलांना देखील शिक्षेची तरतूद असल्याने तीन वर्षाचा कारावास किंवा २५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

पोलिसांकडून सातत्याने आवाहन

अनेक पालक आपला छोटा मुलगा, मुलगी दुचाकी, मोपेड कशी छान चालवर्ता, याचे कौतुक करतात; परंतु त्यांच्याकडून अपघात होऊ शकतो याचा जराही विचार करत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने मुला-मुलीच्या हाती गाडीची चावी देऊ नका, असे आवाहन केले जाते.

नियमभंग : दंड

रस्ते नियमांचा भंग : 500
प्रशासनाचा आदेश भंग : 2000
परवाना नसलेले वाहन चालवणे : 5000
पात्र नसताना वाहन चालवणे : 10,000
वेग मर्यादा तोडणे : 2000
धोकादायक वाहन चालवणे : 5000
दारु पिवून वाहन चालवणे : 10,000
वेगवान वाहन चालवणे : 5000
विना परवाना वाहन चालवणे: 5000 ते 10,000
दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्ती : 2000
रुग्णवाहिकासारख्या वाहनांना रस्ता न देणे : 10,000
विमा नसताना वाहन चालवणे : 2000
अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा : 25,000 व तीन वर्षे तुरुंगवास (मालक-पालक दोषी)