कराडात गांजा ओढणाऱ्या 6 जणांवर पोलिसांची कारवाई; साहित्य जप्त करून गुन्हा दाखल

0
16
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यापरवी अनेकदा पोलिसांच्या कारवाईत अंमली पदार्थ देखील हस्तगत करण्यात आलेले आहरेत. दरम्यान, रविवारी कराड पोलिसांनी कारवाई करीत चिलीममधून गांजा ओढणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. संबंधितांकडून गांजासह अन्य साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, कराड शहरासह परिसरातील बैलबाजार रोड, ईदगाह मैदान, कोयना व कृष्णा नदीकाठावर निर्जनस्थळी काहीजण गांजा ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने ठिकठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संबंधित चिलीमद्वारे गांजाचे सेवन करताना काही जण आढळून आले. यावेळी पोलिसांनी धरपकड करत सहा जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेले संबंधित सर्वजण नशेत होते. त्यांनी गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांकडून पोलिसांनी अर्धवट जळालेला गांजा, चिलीम यासह इतर साहित्य जप्त केले. सहायक पोलिस निरीक्षक शादिबान, महिला उपनिरीक्षक माने यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.