ऊसतोड सुरू असताना फडात दिसला 6 महिन्याचा बिबट्याचा बछडा

0
78
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील नारळवाडी येथील शिवारात ऊस तोड सुरू असताना ऊसाच्या फडात बिबट्याच्या सहा महिने वयाचा बछडा आढळून आल्याची घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारळवाडी येथील दादासो पाटील यांच्या बाग नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना कामगारांना उसाच्या पाचटीत बिबट्याचे पिल्लू आढळून आले. यानंतर ऊसतोड मजुरांनी ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी याबाबत मल्हारपेठ वनाधिकार्‍यांना याची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचताच ऊस क्षेत्राची पाहणी कक्षरीत रेस्क्यू टीमद्वारे येथे पिंजरा व कॅमेर्‍याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकारी नलवडे यांनी दिली.

वनपाल ठोबरे वनरक्षक संतोष यादव, विशाल हरफळ वनरक्षक रोहित लोहार वनरक्षक,मेघराज नवले वनरक्षक रमेश कदम वनसेवक नारळवाडी चे सरपंच अजित चव्हाण, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी बिबट्याचे पिल्लू पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. येथील बाग नावाच्या शिवारात मोठ्या प्रमाणावरती ऊस क्षेत्र असल्यामुळे अनेक वेळेला येथील शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.