दुष्काळाचे सावट दूर झाले, कोयना धरण ‘इतके’ टक्के भरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला असून धरणातील पाणीसाठा 104.60 टीएमसीवर गेला आहे. तर धरणात 99.48 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. आॅगस्ट महिन्यातही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे दुष्काळाचे सावट दूर झालेले आहे.

पश्चिम भागासह सर्वत्र मागील १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तरीही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सध्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांत १४६ टीएमसीवर पाणीसाठा गेलेला आहे.

Koyna Dam

Date: 18/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2163’00” (659.282m)

Dam Storage:
Gross: 104.60 TMC (99.38%)
Live: 99.48 TMC (99.35%)

Inflow : 2,100 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2,100 Cusecs.

Total Discharge in Koyna River: 2,100 Cusecs

Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 00/5335
Navaja- 07/6522
Mahabaleshwar- 08/6196