पाटण प्रतिनिधी । पाटण आणि कराड तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून शेतकऱ्यांकडून शेतशिवारात आंतरमशागतीची कामे केली जात आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून आज मंगळवारपर्यंत धरणात 90.67 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रासहित संपूर्ण पाटण तालुक्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस कोसळला. परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीसाठ्याने 90 टीएमसीचा टप्पा पार केला. त्यामुळे 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे कोयना धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रासाहित पाटण तालुक्यातील बहुतांशी भागांत पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे.
आज मंगळवारी सकाळपर्यंत काेयनानगर येथे 06 मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर नवजा येथे 19 आणि महाबळेश्वरला 09 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात 6 हजार 172 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 86.15 टक्के झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी आहे. तर सध्या धरणातून पूर्णपणे विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
Koyna Dam
Date: 13/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2152’02” (655.980m)
Dam Storage:
Gross: 90.67 TMC (86.15%)
Live: 85.55 TMC (85.44%)
Inflow : 6,172 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 06/4286
Navaja- 19/5093
Mahabaleshwar- 09/4845