पाटण प्रतिनिधी । अजून दीड महिना बाकी असताना सध्या जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज रविवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारी नुसार कोयना धरणात 89.93 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे.
मागीलवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक झाले आहे. गेल्यावर्षी १० आॅगस्टपर्यंत कोयनानगर येथे ३ हजार १६१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा 4 हजार 273 मिलिमीटर पाऊस झाला. त्यातच अजूनही कोयना धरणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाच हजार मिलिमीटचाही टप्पा पार होऊ शकतो. तर नवजा येथे आतापर्यंत 5 हजार 063 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरलाही आतापर्यंत 4 हजार 827 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
मागीलवर्षीच्या तुलनेत महाबळेश्वरला ५८२ मिलिमीटर अधिक पाऊस पडलेला आहे. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, गतवर्षी 84.81 टीएमसीवरच साठा झालेला आहे. यंदा मात्र, आताच धरणात 89.93 टीएमसी पाणीसाठा असून सध्या पाऊस कमी असलातरी धरणात आवक सुरूच आहे.
Koyna Dam
Date: 11/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2151’07” (655.803m)
Dam Storage:
Gross: 89.93 TMC (85.44%)
Live: 84.81 TMC (84.70%)
Inflow : 9,876 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 02/4273
Navaja- 08/5063
Mahabaleshwar- 05/4827