कोयना धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल 90 टीएमसीकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडलेला. पण, यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज रविवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 89.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. नवजा आणि महाबळेश्वरलाही जादा पर्जन्यमान झाले आहे. तर सध्या कोयना धरणातील पाणीसाठा 90 टीएमसीवर पोहोचला आहे.

मान्सूनचा पाऊसच जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरतो. यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जूनमधील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात केली. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणी झाली आहे. तसेच मोठ्या प्रकल्पातही पाणीसाठा वाढला. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात ४४ टक्के अधिक पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख प्रकल्पात ८० ते ८७ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा झालेला आहे. सध्या या धरणात सुमारे १२५ टीएमसी साठा आहे. त्यातच पावसाचा अजून दीड महिना आहे. यामुळे धरणे भरु शकतात.

मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने कोयना धरण पूर्ण भरलेले नव्हते. धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, गतवर्षी ९४ टीएमसीवरच साठा झालेला. यंदा मात्र, आताच धरणात ८८.६५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यातच सध्या पाऊस कमी असलातरी धरणात आवक सुरूच आहे. अजूनही पाऊस होणार असल्याने धरण भरणार आहे. कोयनेत गतवर्षीच्या तुलनेत ५.६७ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.

Koyna Dam

Date: 11/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2151’03” (655.701m)

Dam Storage :

Gross: 89.50 TMC (85.04%)
Live: 84.38 TMC (84.27%)

Inflow : 9,876 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.

Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 27/4271
Navaja- 52/5055
Mahabaleshwar- 60/4822